सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलिसांकडून वृक्षारोपण
गंगापूर, (प्रतिनिधी): भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर पोलिस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी (दि. ३१) सकाळी रन फॉर युनिटीफ या धावण्याच्या उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन गंगापूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. प्रवीण नवले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या धावण्याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरातील श्री संत शिरोमणी सेना महाराज चौकातून करण्यात आली. यानंतर सहभागी नागरिकांनी एकता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत लासूर मार्गावरील पारख मैदानावर या उपक्रमाचा समारोप केला.
 सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. या प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. ओनत पोलीस पोलीस ठाणे गंगापुर, प्रवीण नवले, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, संदेश गंगवाल, डॉ. उद्धव काळे, बाबासाहेब गायके, उद्योजक संतोष अंबलवादी, युसूफ मौलाना, रमाकांत बनसोड, शेख नईम सर, तसेच डॉक्टर, वकील, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे गंगापूर पोलिसांनी राष्ट्रीय एकता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
 
 
                         
                                














